संगमनेर – साकूर (ता. संगमनेर) येथील अफसानाबानू लतीफ शेख हिस राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुणगौरव शिक्षकरत्न पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. हा राज्यस्तरीय पुरस्कार मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे मुंबई येथे राष्ट्रीय कीर्तनकार श्‍यामसुंदर महाराज सोन्नर यांच्या हस्ते देण्यात आला.
शेख ही साकूर येथील जि. प. उर्दू शाळेत संगणक शिक्षिका म्हणून विनामोबदला काम करत असल्याने या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी ऍड. कृष्णा जगदाळे, कृष्णा गोगावले, शांताराम खानविलकर, मनीषा घार्गे, पुष्पा कोल्हे आदी उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल शेख हिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)