अफवा बॉम्बची… निघाला भाजीपाला

सातारा,दि.3(प्रतिनिधी) सातारा शहरालगत असलेल्या अजंठा चौकातील उड्डाणपूला जवळ बेवारस बॉक्‍स मध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेने पोलिसांची पळापळ उडाली होती. बॉम्ब असल्यास कोणतीही जिवीतहानी होऊ नये यासाठी पोलिसांनी सातारा रहिमतपूर हा रस्ता तब्बल अर्धा तास रोखून धरला होता.यावेळी त्या बॉक्‍सची तपासणी करण्यासाठी बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर त्या बॉक्‍समध्ये बॉम्ब नाही तर चक्क भाजीपाला निघाल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
अजंटा चौकातील उड्डाण पुलानजीक दोन बेवारस बॉक्‍स असून, त्यामध्ये बॉम्ब असल्याचा निनावी फोन बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास पोलिसांना आला होता.त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बॉम्बमुळे कोणाला धोका पोहचू नये यासाठी सातारा ते रहिमतपुर हा रस्ता रोखून धरला. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना व परिसरात राहणाऱ्या नागरिकांना कोणाताही धोका पोहचु नये यासाठी बॉंम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आल होते. बॉम्बशोधक पथकाने यावेळी संबंधीत बॉक्‍सची तपासणी केली. त्यावेळी बॉक्‍समध्ये भाजीपाला असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्या बॉक्‍समध्ये भाज्या असल्याचे आढळल्यानंतर पोलिस व बॉम्बशोधक पथकाने सुटकेचा निश्वास टाकला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)