अफवांमुळे अनेक शाळा बंद

मुलांना घरी सोडण्यास काही शाळांचा नकार
पुणे – पहाटेच्या वेळीच काही एका स्कूलबसवर दगड फेकल्याचे वृत्त समजताच अनेक शाळांनी सकाळच्या वेळीच शाळा बंद घोषित केले. अनेक स्कूलबस चालक आलेच नसल्यानेही अनेक ठिकाणी शाळांपर्यंत मुले पोहचू शकली नाहीत. तर काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या शाळा सुटल्यानंतरही त्यांना घरी सोडण्यास नकार दिला. यामुळे भारत बंदच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांचा चांगलाच गोंधळ उडालेला पहायला मिळाला.
शहरातील हुजूरपागा, हचिंग्स स्कूल, विबग्योअर स्कूल, सिंहगड स्रिंगडेल, बिशप्स स्कूल आदी शाळांमध्ये हा संभ्रम पहायला मिळाला तर अनेक शाळांमध्ये आज कमी उपस्थिती पहायला मिळाली.
कॉग्रेंस तसेच अन्य पक्षांनी सोमवारी पुकारलेल्या भारत बंदचा आधी फारसा गाजावाजा झाला नाही, मात्र सकाळच्या वेळात मुलांच्या शाळेच्या बस अडविल्या, तसेच काही पीएमपीएमएलच्या बस अडविल्यानंतर पालक आणि विद्यार्थ्यांची मोठी धांदल उडाली. सकाळच्या वेळात अनेक पालकांनी आपल्या मुलांना शाळेत सोडले तर काही ठिकाणी सकाळच्या वेळातच व्हॉट्‌स ऍपवर बस तोडफोडीचे मसेज व फोटो व्हायरल झाल्याने अनेकांनी आपल्या पाल्यांना शाळेत न सोडणे पसंत केले. तसेच शाळांनीही सावध पवित्रा घेत शाळा बंद ठवणे किंवा शाळा लवकर सोडण्याचा निर्णय घेतला.
शहरातील मध्यवर्ती भागात असलेली हुजूरपागा शाळा सकाळी साडेनऊलाच सोडून देण्यात आली तर स्प्रिंगडेल शाळेने सर्व पालकांना फोन व मेसेज करुन आपल्या पाल्यांना संध्याकाळी सहा नंतर सोडण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे दुपारी सोडलेल्या शाळेतील मुले सायंकाळी सहापर्यंत तशीच ताटकळत राहू नये यासाठी पालकांनी दुपारीच आपापल्या पाल्यांना घरी आणले. दरम्यान सायंकाळपर्यंत केवळ केलुम या शाळेची बस फोडल्याचे वृत्त होते. संस्कृती ग्रुपच्या शाळेची बस फोडल्याचे फोटो व्हायरल केले जात होते मात्र ही बस आदल्या दिवशी रात्रीच फुटली असून याचा संपाशी काही संबंध नसल्याचे शाळेने स्पष्ट केले. हचिंग्ज शाळेनेही मुलांना घरी घेऊन जाण्याची पालकांना विनंती केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)