अफगाण हल्ल्याचा पाक पंतप्रधानांनी केला निषेध

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद अब्बासी खाकानी यांनी अफगाणिस्तानातील आत्मघातकी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. अफगाणिस्तानात स्थायी शांती आणि स्थैर्यासाठी आपला देश सर्व प्रकारची मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अफगाणिस्तानात विद्यापीठ आणि हॉस्पिटल यांच्याजवळ झालेल्या आत्नघातकी दहशतवादी हल्ल्यात 29 जण मरण पावले आहेत. अफगाणिस्तानचे पाकिस्तानमधील राजदूत हजरत ओमर झाकिवाल यांच्याशी बोलताना खाकानी यांनी वरील विचार व्यक्त केले आहेत.

अफगाणिस्तान करत असलेल्या शांतीप्रयत्नांना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचा खाकानी यांनी पुनरुच्चार केला आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन देशांत विविध क्षेत्रातील सहकार्य आणि द्विपक्षीय व्यापार वाढवण्यावर त्यांनी जोर दिला आहे. तापी (तुर्कमेनिस्तान-अफगाणिस्तान-पाकिस्तान-इंडिया) पाईपलाईन आणि कासा (सेंट्रल एशिया साऊथ एशिया) पॉवर प्रकल्पांसह अन्य विभागीय प्रकल्पांच्या जलद पूर्ततेबाबत त्यांनी आशा व्यक्त केली आहे.

अफगाणिस्तानचे राजदूत हजरत ओमर झाकिवाल यांनी पंतप्रधान खाकानी यांचे पाकिस्तान देऊ करत असलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले आहेत. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी आणि अफणागिस्तानचे नेतृत्व पाकिस्तानबरोबर सर्व क्षेत्रात लाभदायक सहकार्यास उत्सुक असल्याचे त्यांनी खाकानी यांना सांगितले.
अफगाण हल्ल्याची जबाबदारी इसिस ने स्वीकारली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)