अफगाणिस्तान बाबत पाकिस्तानकडून नव्या हालचाली

इस्लामाबाद – अफगाणिस्तानात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांना पाकिस्तानी भूमीतून प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप अफगाणिस्तानने सातत्याने केला आहे. पण तरीही पाकिस्तानी सरकारकडून त्याविषयी कोणतीही ठोस उपाययोजना केली गेली नव्हती.

तथापी आता तेथे नवीन सरकार सत्तेवर आल्याच्या पार्श्‍वभूमीवर आता पाकिस्तानकडून अफगाणिस्तान धोरणाबाबत काही नवीन हालचाली सुरू होत असल्याचे संकेत मिळत आहेत. याच संबंधात चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह मेहमुद कुरेशी हे अफगाणिस्तानात दाखल झाले.

पाकिस्तानी विदेश मंत्र्यांच्या प्रवक्‍त्याने सांगितले की प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी अफगाणिस्तानबरोबर एकजुटीने प्रयत्न करण्याचा पाकिस्तानचा इरादा असून त्याविषयी तेथील राष्ट्र प्रमुखांशी चर्चा करण्यासाठीच कुरेशी हे त्या देशाच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)