अफगाणिस्तानात लष्करी ठाण्यावर तालिबानचा कब्जा

संग्रहित छायाचित्र

मजार-ए-शरीफ (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानातील एका लष्करी ठाण्यावर तालिबानींनी कब्जा मिळवल्याची माहिती लष्करी प्रवक्‍त्याने दिली आहे. सध्या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या गजनी शहरात तालिबानी आणि लष्करात घमासान चालू आहे. त्यातच उत्तर अफगाणिस्तानातील एका लष्करी ठाण्यावर तालिबानींनी कब्जा मिळवला आहे.

अशांत फरयाब प्रांतातील घोरमाच जिल्ह्यातील चेनया ठाण्यावर तालिबानींनी केलेल्या हल्ल्यात 14 सैनिक मारले गेले असून 40 सैनिक पकडले गेले आहेत. रविवारी चेनया ठाण्यावर तालिबानींनीं हल्ला चढवला तेव्हा ठाण्यात 100 सैनिक होते. काही सैनिकांनी पळून जाऊन जवळच्या पहाडी भागात आसरा घेतला आहे.

-Ads-

चेनया लष्करी ठाण्यावर हल्ला करण्यापूर्वी तालिबांनीनी गजनी शहरावर चौतर्फा आक्रमण केले होते. ठाण्यावरील सैनिकांनी तालिबानी हल्ल्यानंतर जादा कुमक मागितली होती, पण गजनीत गुंतलेल्या लष्कराचे तिकडे दुर्लक्ष झाले
गजनीमधून तालिबानींना घालवण्यासाठी लष्कराचे प्रयत्न पाचव्या दिवशीही चालू असून त्यांना अमेरिकन हवाई दलाची मदत मिळत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)