अफगाणिस्तानात इसिसच्या 150 दहशतवाद्यांची शरणागती

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानात दीडशेपेक्षा अधिक इसिस दहशतवादी शरण आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उत्तर-पश्‍चिम जावजान प्रांतातून तालिबान्यांनी घालवून दिल्यानंतर इसिसच्या दीडशेपेक्षा अधिक दहशतवाद्यांनी सुरक्षादलांसमोर शरणागती स्वीकारली असल्याचे पोलीस प्रमुख फकीर मुहम्मद्‌ जावजानी यांनी सांगितले आहे. बुधवारी एकूण 152 इसिस दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर शस्त्रास्त्रे टाकून आत्मसमर्पण केले. इसिस कमांडर हबीब-उल-रहमान याचाही या 152 जणांत समावेश आहे.

दोन जिल्ह्यांमध्ये तालिबानींचा प्रभाव वाढल्यामुळे इसिस दहशतवाद्यांना शस्त्रात्रे टाकून शरणागती पत्करावी लागत आहे, असे प्रांतीय परिषदेचे अध्यक्ष अब्दुल हई हयात यांनी सांगितले. तालिबान आणि इसिस दोन्ही दहशतवादी संघटनांना अफगाणिस्तानातील पश्‍चिमी समर्थन असलेले सरकार घालवून इस्लामी शासन लागू करू करायचे आहे, परंतु नेतृत्व, विचारधारा आणि रणनीती यावरून त्यांच्यात प्रचंड मतभेद आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जावजान प्रांतातून आम्ही दुष्ट शक्तींचा नायनाट केला आहे, आणि जनतेला त्यांच्या जुलुमांतून मुक्त केले आहे. डझनावारी इसिस दहशतवादी आम्ही मारले असून 130 जणांना पकडले आहे. असे तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी सांगितले. या चकमकींमध्ये 17 तालिबानी योद्धे मारले गेलेले असून 13 जखमी झाले असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे.
जावजान प्रांतातील इसिसवर अमेरिकेनेही हवाई हल्ले चालवले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)