अफगाणिस्तानातील आत्मघातकी बॉम्बस्फोटामध्ये किमान 31 ठार

काबुल – अफगाणिस्तानामध्ये मतदान नोंदणी केंद्राबाहेर झालेल्या आत्मघातकी स्फोटामध्ये किमान 31 जण ठार झाले आहेत. अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळा आणण्याच्या उद्देशाने हा आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवण्यात आला. अफगाणिस्तानमध्ये अलिकडच्या काळात झालेला हा सर्वात मोठा बॉम्बस्फोट होता, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

अफगाणिस्तानमध्ये यावर्षी 20 ऑक्‍टोबरला प्रांतिय विधीमंडळाच्या निवडणूका होणार आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीची पूर्वतयारीच या निवडणूकीमध्ये होणार आहे.स्फोट घडलेले मतदान नोंदणी केंद्र शिया समुदायाची दाट वस्ती असलेल्या काबुलच्या पश्‍चिमेकडे आहे. मतदान हक्कांसाठी आवश्‍यक राष्ट्रीय ओळख नोंदणी येथे केली जात असते. या स्फोटानंतर संतप्त नागरिकांनी सरकार आणि तालिबानच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या स्फोटाची जबाबदारी लगेच कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. तालिबानने या स्फोटातील आपला सहभाग नाकारला आहे.

मतदान नोंदणी केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळच हा आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला, असे शहराचे पोलिस प्रमुख दावूद आमिन यांनी सांगितले. या स्फोटात 31 जण ठार तर 54 जण जखामी झाले. जखमींचा आकडा आणखीही वाढला असण्याची शक्‍यता आहे. तसेच अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडाही वाढण्याची शक्‍यता आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. सरकारमधील वेगवेगळ्या विभागांकडून आणि अधिकाऱ्यांकडून या बॉम्बस्फोटातील मृत आणि जखमींचे वेगवेगळे आकडे सांगितले जात असतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)