काबूल – अफगाणिस्तानमधील ओरूज्गान आणि कंदहार या दोन्ही ठिकाणी हवाई दल आणि सैन्याने केलेल्या कारवाईत सुमारे 58 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

ओरूज्गान येथील रस्त्यावर मंगळवारी रात्री शेकडो दहशतवाद्यांनी 2 सुरक्षा चौकींवर हल्ला चढवला होता. सुरक्षा दलाने दिलेल्या चोख प्रत्युत्तरामुळे दहशतवाद्यांनी पळ काढला. पोलीस प्रमुख अब्दुल कवी ओमारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 40 दहशतवादी ठार झाले. तसेच तिरीन कोटजवळ सेनेकडून करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये 7 सशस्त्र तालिबानी दहशतवादी ठार झाले.

प्रांतीय पोलीस प्रमुख अब्दुल राजेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळील कंदहार प्रांतामध्ये मंगळवारी रात्री संयुक्त अफगाण आणि अमेरिका यांनी संयुक्तपणे केलेल्या हवाई हल्ल्‌यात 11 दहशतवादी ठार झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)