अफगाणिस्तानमध्ये शिया प्रार्थनास्थळावर आत्मघातकी हल्ला

हेरात – अफगाणिस्तानमधील हेरात शहरातल्या शिया प्रार्थनास्थळावर आज झालेल्या दोन आत्मघातकी हल्ल्यांमध्ये किमान एक जण ठार झाला. तर 8 जण जखमी झाले. यातील पहिला हल्ला हेरात शहरातल्या नबी अक्रम प्रार्थनास्थळावर झाला. मात्र सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोराला जागेवरच गोळ्या घालून ठार केले. तर दुसऱ्याने प्रार्थनास्थळाच्या आत प्रवेश करून आत्मघातकी स्फोट घडवून आणला. यामध्ये एक जण ठार झाला, तर अन्य 8 जण जखमी झाले. प्रांतिय राज्यपालांच्या प्रवक्‍त्याने ही माहिती दिली. यातील जिवीत हानीला पोलिस दलाच्या उपप्रमुखांनी दुजोरा दिला आहे.

या आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. मात्र शिया प्रार्थनास्थळांवर प्रामुख्याने इस्लामिक स्टेटकडूनच हल्ले केले जात असतात. गेल्या बुधवारी काबुलमध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्वीकारली आहे. या हल्ल्यामध्ये किमान 33 जण ठार झाले होते आणि डझनभर जखमी झाले होते. पारशी नववर्ष नौरोझच्या सुटीदरम्यान आनंदोत्सवात हा आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)