अफगाणिस्तानच्या नंगेहार बॉबस्फोटाची जबाबदारी घेतली इसिसने

संग्रहित छायाचित्र

काबूल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानच्या नंगेहार बॉबस्फोटाची जबाबदारी इसिसने घेतली आहे. नंगेहार प्रांतातील खेळाच्या मैदानाबाहेर झालेल्या या बॉंबस्फोटात तीन जण मरण पावले होते आणि अन्य 10 जण जखमी झाले होते. इसिससंबधित एका वेबसाईटवर निवेदन प्रसिद्ध करून इसिसने या बॉंबस्फोटाची जबाबदारी घेतली आहे, सरकार समर्थक बैठक या बॉंबस्फोटाचे उद्दिष्ट होते. परंतु खेळाच्या मैदानातील माजी कमांडर गुलबुद्दीन हिकमतीयार याची सरकार समर्थक बैठक समाप्त झाल्यानंतर काही वेळाने हा मोटरसायकल बॉंबस्फोट करण्यात आला होता.

सरकारसमर्थक मिलिशिया जवानांची बस उडवणे हा या बॉंबस्फोटाचा उद्देश होता असे दुसऱ्या एका निवेदनात सांगण्यात आले आहे.

हिकमतीयार याचा समावेश पूर्वी दहशवाद्यांच्या यादीत करण्यात आला होता, परंतु सन 2017 मध्ये राष्ट्रपती अशरफ गनी यांच्याबरोबर शांती समझोता केल्यानंतर त्याचे नाव दहशतवाद्यांच्या यादीतून काढून टाकण्यात आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)