अफगाणिस्तानच्या खेळाडूंची चार दिवसीय सरावावर मदार 

अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तसेच अफगाणिस्तान संघानेही मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सर्वांना प्रभावित केले आहे. परंतु पांढऱ्याशुभ्र पोशाखात कसोटी क्रिकेट खेळण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे. तरीही अफगाण खेळाडूंचे मनोधैर्य उच्च प्रतीचे असल्याची ग्वाही कर्णधार असगर स्तानिकझाईने दिली आहे.

कसोटी सामना खेळण्यासाठी आपल्या संघाची मदार चारदिवसीय सामन्यांतील सरावावर असल्याचे सांगून स्तानिकझाई म्हणाला की, आमचे समस्त नागरिक आमच्या कामगिरीकडे डोळे लावून बसले आहेत याची आम्हाला जाणीव आहे. बांगला देशविरुद्धची टी-20 मालिका जिंकल्याने त्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. परंतु आम्हाला आव्हानांची पुरेपूर जाणीव आहे. पहिलावहिला कसोटी सामना हा अफगाण क्रिकेटसाठी संस्मरणीय क्षण आहे. या क्षणासाठी अनेकांनी बहुमोल योगदान दिले आहे. आम्ही या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करून त्या सर्वांच्या ऋणातून काही प्रमाणात तरी मुक्‍त होण्याचा प्रयत्न करू.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)