अफगाणिसानात आत्मघातकी बॉम्बस्फोटात किमान 40 ठार 

काबुल – अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये मंगळवारी एका धार्मिक समारंभामध्ये झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटामध्ये किमान 40 जण ठार झाले आहेत. तर 60 जण जखमी झाले झाले आहेत. अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही महिन्यात झालेल्या हल्ल्यांपैकी कालचा बॉम्बस्फोट सर्वात भीषण होता.

प्रेषित महंम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित या धार्मिक नेत्यांच्या समारंभासाठी उलेमा कौन्सिलचे सदस्यही उपस्थित होते. आत्मघातकी हल्लेखोराने सभागृहामध्ये घुसल्यावर बॉम्बचा स्फोट घडवून आणला. असे काबुल पोलिसांच्या प्रवक्‍ताने सांगितले. हा बॉम्बस्फोट इतका भीषण होता की मृतांचा आकडा 50 पेक्षाही वाढण्याची शक्‍यता असल्याचे या प्रवक्‍त्याने सांगितले.

-Ads-

तालिबानने या बॉम्बस्फोटाशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. अफगाणिस्तानमध्ये अशाप्रकारे आत्मघातकी बॉम्बस्फोट इस्लामिक स्टेटकडून केले जात असल्यामुळे कालच्या बॉम्बस्फोटामागे इसिसचा हात असल्याचे बोलले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)