अप्रेंटीस विद्यार्थ्यांसाठी 20 टक्के जागा राखीव

नवी दिल्ली – रेल्वेच्या सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना रेल्वेच्या चालू भरतीत सामावनू घेण्याची मागणी शिवसेनेच्या प्रतिनिधीमंडळाने आज रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली. मात्र, 20 टक्‍क्‍यांच्यावर प्रशिक्षणार्थ्यांना सामावून घेता येणार नाही, असे गोयल यांनी स्पष्ट सांगितले.

लोकसभेतील सेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या खासदारांनी आज रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची भेट घेवून मुंबईत आंदोलनामुळे निर्माण झालेल्या स्थितीची जाणीव करून दिली. रेल्वेने 90 हजार जागांसाठी अर्ज मागविले आहे. या जागांवर सर्व अप्रेंटीस विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. परंतु, ही बाब शक्‍य नसल्याचे गोयल यांनी सेनेच्या शिष्टमंडळाला स्पष्टपणे सांगितले.

गोयल यांच्यानुसार, अप्रेंटीस विद्यार्थ्यांसाठी नोकरीत 20 जागा राखीव आहेत. याशिवाय त्यांना सामान्य वर्गातूनही अर्ज करता येणार आहे. सध्या देशभरात कोट्यवधी विद्यार्थी अप्रेंटीस करीत आहेत. त्यामुळे सर्व जागांवर त्यांना सामावून घेतले तर देशातील उर्वरित बेरोजगांवर हा अन्याय होईल. शिवाय अप्रेंटीस म्हणजे नोकरीची हमी नव्हे. तांत्रिक शिक्षणानंतर अनुभव मिळावा म्हणून सरकारने अप्रेंटीस योजना सुरू केली आहे. प्रत्येक अप्रेंटीस विद्यार्थ्याला नोकरीत सामावून घेण्याचे बंधन लादले तर कोणत्याही कारखान्यात प्रशिक्षण मिळणार नाही, असेही गोयल यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)