अपोलो हॉस्पिटलचे सीसीटिव्ही बंद होते…

जयललिता यांच्यावर हॉस्पिटलकडून उपचारात कमतरता नाही

चेन्नई – तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता या अपोलो रुग्णालयामध्ये दाखल असताना हॉस्पिटलमधील जयललिता यांच्या खोलीतेल सीसीटिव्ही बंद करण्यात आले होते, असे आज अपोलो हॉस्पिटलच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. जयललिता यांना पाहण्याचा कोणी प्रयत्न करू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली होती, असे अपोलो हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष प्रताप रेड्डी यांनी सांगितले. जयललिता यांच्यावरील उपचारांमध्ये हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांकडून कोणतीही कसूर झाली नाही. जयललिता यांना वाचवण्याचा मेडिकल स्टाफने पूरेपूर प्रयत्न केला होता. मात्र हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्यामुळे जयललिता यांचा मृत्यू झाला, असेही त्यांनी सांगितले.

जयललिता यांना हॉस्पिटलमध्ये आणण्यात आल्यानंतर अन्य रुग्णांना अन्य “आयसीयु’ंमध्ये हलवण्यात आले होते. “आयसीयु’मध्ये केवळ जयललिता यांनाच ठेवण्यात आले होते. एकूण 24 खोल्यांपैकी याच एका खोलीचे सीसीटिव्ही फुटेज काढून टाकले गेले. जयललिता यांना कोणी बघू नये, हा त्यामागील हेतू होता. त्यामुळे जयललिता यांना कोणालाही भेटू दिले गेले नाही, हे दर्शवणारे कोणतेही फुटेज उपलब्ध नसल्याचेही त्यांनी सांगितले.

अपोलो हॉस्पिटलमध्ये आयोजित एका वैद्यकीय परिसंवादादरम्यान डॉ. रेड्डी यांनी ही माहिती दिली. ताप आणि अतिसारामुळे जयललिता यांना 2016 च्या सप्टेंबर महिन्यात हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तब्बल 75 दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर याच वर्षी 5 डिसेंबर रोजी जयललिता यांचा मृत्यू झाला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)