“अपोलो’ ने घेतलेल्या नमुन्यांचा नासा प्रथमच अभ्यास करणार

वॉशिंग्टन  – अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था “नासा’ने अपोलो मिशनने पाठवलेल्या नमुन्यांचा अभ्यास करणार आहे. हा अभ्यास करण्यासाठी 9 पथके तयार केली आहेत. अपोलो मिशनने 50 वर्षापूर्वी 1970 मध्ये चंद्रावरील काही नुमने जमा केले होते. मात्र, या नमुन्याचा आजवर अभ्यास करण्यात आलेला नाही. त्यामुळे या नुमन्यावर नासाकडून प्रथमच अभ्यास केला जाणार आहे.

अपोलो मिशन 15, 16 आणि 17 यातील नमुन्यांचा यात समावेश आहे. अपोलो अवकाश यानाने जमा केलेल्या नमुन्यांमधील अत्यंत महत्वाचा भाग नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटर येथे डिसेंबर 1972 पासून सुरक्षित ठेवण्यात आला आहे. अपोलो 15 मिशनमधील नमुने 1971 पासून हेलियम वायूत ठेवले आहेत. चंद्रापासून लांब अंतरावरीलच नमुने नासाने जमा केलेले आहेत.

-Ads-

चंद्रावरील या नमुन्यांच्या अभ्यासामुळे नवीन शास्त्रज्ञांना माहितीसाठी आणि पुढील शोधासाठी फायदा होणार आहे, असे नासाचे थॉमस झुर्बुचन यांनी सांगितले. नऊ पैकी सहा टीम उर्वरित तीन नमुन्यांचा अभ्यास करणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)