अपेक्षेनुसार मनोहर पर्रिकर यांचा पणजी येथून दणदणीत विजय

पणजी : गोव्यातल्या पणजी विधानसभेच्या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा अपेक्षेनुसार ४,८०३ मतांनी दणदणीत विजय झाला आहे. मनोहर पर्रिकर यांना ९,८६२ तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे गिरीश चोंडकर यांना ५,०५९ मते मिळाली आहेत.

वाळपई विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे विश्वजीत राणे १०,०६६ मतांनी विजयी झाले आहेत.

या प्रसंगी पंतप्रधानांनी पर्रीकर आणि राणे यांना  शुभेच्छा देऊन पणजी व वाळपई येथील जनतेचे आभार मानले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)