अपेक्षित विकासदर गाठणे अशक्‍य; सरकारनेच दिली कबुली

कर्जमाफी व बुडीत कर्जावर फोडले खापर

साडे सात टक्के विकास दर गाठणे अशक्‍य असल्याचे केले मान्य

नवी दिल्ली – केंद्र सरकारने सहामाही आर्थिक सर्वेक्षणाचे निष्कष आज जाहीर केले. त्यात विकास दर घटत असल्याची बाब समोर आली असून यंदा साडे सात टक्‍क्‍यांचा आर्थिक विकास दर गाठणे अशक्‍य असल्याची कबुली सरकारने दिली आहे. देशाची अर्थव्यवस्था वेगाने विकसीत होत असून यावर्षी साडे सात टक्‍क्‍यांचा विकास दर नक्की गाठू असा विश्‍वास सरकारने गेल्या आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त केला होता पण सरकारला आता यात माघार घ्यावी लागली आहे.

सरकारने या घटलेलेल्या आर्थिक विकासा दराचे खापर राष्ट्रीय कृत बॅंकांचे बुडीत कर्ज आणि शेतकऱ्यांना द्यावी लागेली कर्जमाफी यावर फोडले आहे. तथापी नोटबंदीचा गैरवाजवी निर्णय व चुकीचे धाडस सरकारच्या अंगलट आले आहे. हे अनेक अर्थतज्ज्ञांनी निदर्शनाला आणून दिले आहे तथापी सरकारने मात्र अद्याप ते मान्य केलेले नाही. उलट या घटत्या विकासदराचे खापर शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या कर्जमाफीवर फोडण्यात आले असून या सर्वेक्षणात सरकारने म्हटले आहे की देशातल्या प्रत्येक राज्यानेच शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचे ठरवले तर त्याचा देशाच्या अर्थकारणावर तब्बल 2 लाख 70 हजार कोटींचा भार पडू शकतो असा इशारा सरकारने दिला आहे. त्याच आधारावर सरकारने या कर्जमाफीत कोणतेही योगदान देण्यास स्पष्ट नकार दिला असून राज्य सरकारांनी आपआपल्या आर्थिक क्षमतेनुसारच त्याची परतफेड करावी असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. आत्ता पर्यंत उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, तामिळनाडु या राज्यांनी कर्जमाफी जाहीर केली आहे. या कर्जमाफीचा देशाच्या विकास दरावर 0.7 टक्के इतका परिणाम होऊ शकतो असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.

केंद्र सरकारने 5.4 लाख लोक नव्याने करांच्या कक्षेत आले आहेत असे म्हटले आहे पण त्याने सरकारच्या तिजोरीची स्थिती सुधारण्याची शक्‍यता नाही ही बाबही प्रकर्षाने समोर आली आहे. केंद्र सरकारकडून चालू आर्थिक वर्षात नेमका कसा वित्त पुरवठा केला जाईल याचीहीं आता शाश्‍वती नाही असेही या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. या साऱ्या स्थितीचा एकत्रित परिणाम महागाईचा भडका उडण्यात घडू शकतो असेही त्यांचे म्हणणे आहे. औद्योगिक विकास दरात प्रगती होताना दिसत नाही. मोठ्या कंपन्यांकडून विकास मंदावला आहे त्यामुळे रोजगार निर्मीतीवरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता यातून सुचित करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)