अपेक्षित राममंदीर लवकरच उभारले जाईल : जितेंद्रनाथ महाराज

सातारा, दि. 28 (प्रतिनिधी)- प्रभू श्रीरामाचे हिंदु धर्माला अपेक्षित राममंदिर लवकरच उभारणी होणार आहे. यात कोणताही संदेह नाही. समर्थ रामदास स्वामीसारख्या मार्गदर्शक शक्तीची या मंदिर उभारणी कार्याला शक्ती मिळाली आहे, असे प्रतिपादन अंजनकार सुर्लीचे प.पू.जितेंद्रनाथ महाराज यांनी केले.
सज्जनगडावरील समर्थ सेवा मंडळ आयोजित चर्तुवेद संहिता पारायण व ऋग्वेद स्वाहाकार सोहळयाच्या सांगता सोहळयात जितेंद्रनाथ महाराज बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी करवीरपीठाचे शंकराचार्य श्री विद्यानृसिंह भारती होते .
यावेळी सोहळयात सहभागी झालेल्या चारही वेदांच्या विद्वान ब्राम्हणांना भेटवस्तू देवून मंडळाच्या वतिने सत्कार करण्यात आला.
गुरूनाथ महाराज कोटणीस यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले , डॉ . श्रीकृष्ण देशमुख ,श्रीमती मंदाताई गंधे यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी समर्थ सेवा मंडळाचे या वेदपारायणाच्या उपक्रमाने खरोखर धर्म रक्षणाचे मोठे काम झाले असून याठिकाणी झालेला स्वाहाकारही आपणा सर्वाना ऊर्जा देणारा आहे असे सांगितले. मंगळवारी रात्रीच्या रंगलेल्या गीतरामायणात ज्येष्ठ गायक श्रीधर फडके यांनी गदिमांच्या गीत रामायणातील अनेक रचना सादर करताना उपस्थितांना सुमारे अडीच तास मंत्रमूग्ध केले . सांगता सोहळयाचे योगेशबुवा रामदासी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे निवेदन मकरंदबुवा रामदासी यांनी केले. या वेळी अनेक समर्थ भक्त उपस्थीत होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)