अपुऱ्या मनुष्यबळ आणि प्रयोगशाळाबाबत नाराजी

मुंबई – बाजारात औषधाचा साठा येण्यापूर्वी त्याची गुणवत्ता तपासली जाते. मात्र, अन्न व औषध प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे मानांकनानुसार गुणवत्ता नसलेल्या औषधांचा साठा परत घेण्यात विलंब झाल्यामुळे ती विकली गेली आहेत. अशा औषधांचे नागरिकांकडून सेवन झाले असून जनतेला भविष्यात गंभीर आजाराला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता असल्याबद्दल भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) यांनी कडक ताशेरे ओढले आहेत.

याशिवाय अनेक सौंदर्य प्रसाधनांच्या मानांकनाची तपासणीही करण्यात आलेली नसल्याची बाब उघडकीस आली आहे. याशिवाय गुटखा, पानमसाला सारख्या उत्पादनांवर राज्यात बंदी असताना त्याची विक्री करताना तो माल जप्त केला. मात्र त्याची तपासणी केली नाही. तसेच त्याबाबतची कारवाईही केली नसल्याबाबतचा ठपकाही कॅगने विभागावर ठेवला. अन्न व औषध प्रशासन विभागात असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळाबाबत, अपुऱ्या प्रयोगशाळा आणि यंत्र सामग्री व कामकाज पध्दतीवर तीव्र शब्दात कॅगने नाराजी व्यक्त केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)