अपुऱ्या मनुष्यबळाचे “विघ्न’ हटेना!

पिंपरी – शहरात स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु होऊनही अपुऱ्या मनुष्यबळाचे शुक्‍लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाही. पहिल्याच गणेशोत्सवात मनुष्यबळाअभावी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे बंदोबस्ताची मदार पोलीस मित्रांवर असणार आहे.

पोलिसांकडे 1 हजार 885 गणेश मंडळांनी नोंदणी केली आहे. लोकसंख्या व मंडळांची संख्या पाहता 1 हजार 501 पोलीस शहरात तर ग्रामीण भागात 315 पोलीस कर्मचारी व एसआरपीएफचे जवान यावेळी सुव्यवस्था राखण्याचे काम करणार आहेत. राज्य राखीव पोलीस दल हे ग्रामीण भागातील सुरक्षिततेसाठी मागवण्यात आले आहे. मात्र बॉम्ब शोधक पथक, श्‍वान पथक अशी कुमक यंदा शहराला मिळू शकली नाही.

यासाठी महापालिका व गणेश मंडळाच्या बैठकी दरम्यानही पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यानांच आवाहन केले होते. पोलीस मित्र व स्थानिक पोलीस ठाण्याच्या कुमकीवर हा बंदोबस्त केला जाणार आहे. पोलीस आयुक्‍त आर. के पद्मनाभन यांनीही उपलब्ध फौजफाट्यावर गणेशोत्सवात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान स्विकारले आहे. पोलीस मित्र व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीनेच शहरात पोलिसींग करण्याचा त्यांचा मानस आहे. यासाठी पोलीस ठाणे स्तरावर मंडळांशी संपर्कही साधला जात आहे.

शहरात उत्सव काळात कोणतीही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मंगळवारपासूनच आम्ही जास्तीत-जास्त कर्मचारी मुख्य चौक व बाजारपेठांमध्ये तैनात केले आहेत. यावेळी वाहतूक कोंडी, सोनसाखळी चोरी, वाहनचोरी अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यानुसार शहरात नाकाबंदी देखील करण्यात आली आहे. तुर्तास आमच्याकडे मोजकेच मनुष्यबळ आहे. त्यावरच हा बंदोबस्त सुरु आहे.
– नम्रता पाटील, पोलीस उपायुक्‍त, परिमंडळ एक.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)