अपुऱ्या पावसाचा रब्बी हंगामालाही फटका

पुणे विभात सर्वाधिक तर नाशकात सर्वात कमी पेरणी

पुणे – राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा फटका ज्याप्रमाणे खरीपाला बसणार आहे. त्याच्यापेक्षा दुप्पटीने अधिक फटका हा रब्बी पिकांना बसणार असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी साधारणत:दिवाळीच्या आसपास रब्बीच्या पेरण्यांची लगबग सुरु होती पण आत्ता ग्रामीण भागात सगळीकडे शांतता दिसत आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार आत्तापर्यंत राज्यात फक्त तीन टक्के क्षेत्रावर रब्बीची तयारी सुरु झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यात यंदा पाऊस कमी झाल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे.अनेक ठिकाणी तर खरीप कसा जगवायचा असा प्रश्‍न पडला आहे. ज्यांची शेती खरीपाची आहे ते आता उपलब्ध असणाऱ्या पाण्यामध्ये पिके काढून घेण्याच्या प्रयत्नात आहेत.त्यानंतर रब्बी ला पाणी मिळेल अशी शक्‍यता कमीच आहे. राज्यातील काही भाग असे आहेत की त्याठिकाणी फक्त रब्बीची पिके घेतली जातात. पावसाळ्यामध्ये धरणे भरल्यानंतर कालव्याद्वारे येणाऱ्या पाण्यामधून ही पिके घेतली जातात पण अनेक ठिकाणी धरणातील पाणी साठा हा जेमतेम असल्यामुळे रब्बी ला पाणी मिळेल असे मला वाटत नाही. जे पाणी मिळेल त्यावर चाऱ्याची लागवड केली जाणार आहे. त्यामुळे रब्बी घटणार हे निश्‍चित दिसत आहे. गेल्या आठवड्याती कृषी अहवालावरुन सुद्धा हे स्पष्ट होताना दिसत आहे.

कृषी विभागाने दिलेल्या अहवालानुसार, राज्यात रब्बीचे सुमारे 53.93 लाख हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यापैकी फक्त 1,74 लाख हेक्‍टर क्षेत्रामध्ये रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. या पेरण्या नाशिक पुणे,कोल्हापूर आणि लातूर या भागात झाल्या आहेत. पुणे विभागात रब्बीचे 17.63 लाख हेक्‍टर क्षेत्र आहे त्यापैकी फक्त 1.02 लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. याशिवाय नाशिक विभागात फक्त 0.03 लाख हेक्‍टरवर पेरण्या झाल्या आहेत तर लातूर विभागात 0.11 लाख हेक्‍टरवर पेरण्या झाल्या आहेत. कोल्हापूर विभागात 0.58 लाख हेक्‍टर वर पेरण्या झाल्या आहेत. सध्या तरी राज्यात सर्वाधिक पेरण्या या पुणे विभागातच झाल्या आहेत.

राज्यातील एकंदरीत पाण्याची उपलब्धता लक्षात घेता रब्बीच्या पिक क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणावर वाढ होईल असे चित्र सध्या तरी दिसत नाही. जे पाणी शिल्लक आहे ते पिण्यासाठी जेवढे आवश्‍यक असल्याने सध्या त्याबाबतच नियोजन सुरु आहे. याशिवाय जनावरे जगविण्यासाठी चारा लागवडीला सुद्धा प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे हवामान खात्याच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)