अपुऱ्या गणसंख्येअभावी वाघोली ग्रामसभा तहकूब

उपसरपंच सातव यांचा आक्षेप ः मंगल कार्यालयावरील ग्रामपंचायतीचा खर्च वाया गेला

वाघोली-अपुऱ्या गणसंख्येअभावी वाघोली ग्रामपंचायतीची 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी बोलाविण्यात आलेली ग्रामसभा तहकूब करण्यात आली. ग्रामसभेचे अध्यक्ष उशिरा आले आणि गणसंख्याच पूर्ण नसल्याचा आक्षेप माजी उपसरपंच संजय सातव यांनी घेतल्यानंतर सभा तहकूब झाली. प्रथमच मंगल कार्यालयाच्या मोठ्या आवारात बोलाविण्यात आलेल्या ग्रामसभेसाठी ग्रामस्थ व सदस्य उशिरा हजर झाल्यामुळे ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान तर झालेच शिवाय कर्मचाऱ्यांची धावपळ देखील वाया गेली.
प्रजासत्ताक दिनी वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने अभिषेक लॉन्स येथे प्रथमच ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिव्यांग निधी, ग्रामपंचायत गाळ्यांच्या चर्चेसह अनेक विषयांवर चर्चा होणार होती. सकाळी अकराच्या सुमारास ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ग्रामसभेसाठीची संपूर्ण तयारी केली होती. मात्र साडे अकरापर्यंत गणसंख्या पूर्ण झाली नव्हती. त्यावेळी ग्रामसभा तहकूब करण्यासही सुचविले होते. सरपंचांसह काही सदस्य ग्रामसभेसाठी हजर राहून व्यासपीठावर विराजमान झाल्यानंतर माजी उपसरपंच सातव यांनी साडेअकरा वाजता असणाऱ्या अपुऱ्या गणसंख्येविषयी आक्षेप घेतला. नियमानुसार ग्रामसभा सुरुवात वेळेपासून अर्ध्या तासामध्ये गणसंख्या झाली नाही तर सभा तहकूब करावी लागत असल्याचे ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर ग्रामसभा तहकूब करण्यात आली. तहकुबीनंतर अपंग व ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. पुढील ग्रामसभा सात दिवसानंतर घेण्यात येणार आहे.

  • घड्याळाच्या काट्यानुसार ग्रामसभा तहकूब
    वाघोली ग्रामपंचायतीच्या मागील ग्रामसभांमध्ये काहीवेळा उशीर झाल्यास एकत्रितपणे सभा घेतल्या जात होत्या. मात्र यावेळी ग्रामसभेमध्ये नियमानुसार अगदी घड्याळाच्या काट्यानुसार ग्रामसभेचा वेळ पकडल्याने साडे अकरानंतर गण संख्येपेक्षा जास्त ग्रामस्थ उपस्थित राहूनसुद्धा अपुऱ्या गणसंख्येअभावी सभा तहकूब करावी लागली.
  • ग्रामसभेसाठी सभाअध्यक्ष साडे अकरानंतर हजर झाले आणि सभेची गणसंख्यादेखील अपुरी (93) असल्याने तहकुबीसंदर्भात आक्षेप घेतला. प्रत्यक्षात साडेअकरा वाजेपर्यंत गणसंख्या अपुरी असल्यास ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसभा तहकूब करणे अपेक्षित होते; मात्र साडेअकरा नंतर सभाध्यक्षांनी सभा तहकूब केल्याची बाब चुकीची आहे.
  • -संजय सातव, माजी उपसरपंच
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)