अपुरी झोप तुमच्या शरीरावर करते परिणाम…(भाग 1)

 

डॉ. प्रिती देवनानी 

आपल्याला वाटत असतं आपलं आपल्या शरीरावर पूर्ण नियंत्रण आहे, खास करून झोपायच्या आणि उठायच्या वेळांवर, पण संशोधनात हे सिद्ध झालं आहे की, हे चुकीचं आहे. भले आपण रात्री घुबडासारखे जागू शकत असू, किंवा अगदी पहाटे उठू शकत असू, परंतु याचा आपल्या जीन्सवर भयंकर परिणाम होत असतो.

पहिला टप्पा – सामान्य संप्रेरकांच्या प्रक्रियांवर परिणाम 
साधारणपणे आपलं शरीर दिवसाला 50 वेगवेगळ्या संप्रेरकांचं उत्पादन करत असते. अव्यवस्थित किंवा अपुऱ्या झोपेमुळे या संप्रेरकांच्या नैसर्गिक उत्पादनांवर परिणाम होतो. झोपेच्या कालावधीत मानवी संप्रेरकांचा विकास आणि पेशींची देखभाल केली जात असते. अपुऱ्या झोपेमुळे या उत्पादनात अडथळा निर्माण होतो, यामुळे शरीराच्या नैसर्गिक विकासाच्या क्षमतेवर आणि पेशींच्या देखभालीवर परिणाम होतो. याशिवाय, आपल्या मेटाबोलिझमवर आणि भूकेवर नियंत्रण ठेवणाऱ्या इतर संप्रेरकांवरही याचा परिणाम होतो, यामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा वाढावी यासाठी जास्तीत जास्त अन्न खाण्याची गरज तुमच्या शरीराला भासू लागते.

दुसरा टप्पा – ऊर्जेच्या स्तरात अस्थिरता आणि लहरी स्वभाव
अपुऱ्या झोपेमुळे ऊर्जेच्या स्तरात घट होते, यामुळे लहरी स्वभाव, दिवसा सतत येणारी झोप आणि कधी कधी अत्यानंद होणे असे प्रकार होतात. अशा प्रकारे बदल होत राहिल्यास दैनंदिन क्रियांतील नैसर्गिक प्रक्रियांवर परिणाम होतो. याशिवाय, दिवसा अतिरिक्‍त झोप येऊ लागते, हे अतिशय अडथळा निर्माण करणारे आणि धोकादायक आहे. यामुळे लक्ष्य केंद्रित करण्यात अडचणी येतात. तसेच आपले शरीर सातत्याने सुटकेसाठी प्रयत्न करत असते. यामुळेच थकलेल्या झोप येणाऱ्या चालकांकडून ट्रॅफिकमध्ये अडथळा निर्माण होतो, किंवा “डुलकी’ लागल्याने अपघात होतात.

तिसरा टप्पा – दीर्घकालीन आजारपण, रोग, कर्करोगाला आमंत्रण 
आपल्याला लगेचच झोप न लागण्याचा त्रास शरीराला असू शकतो, परंतु असे बराच काळ चालत राहिल्यास, आपल्या आरोग्यावर त्याचे नकारात्मक परिणाम होत असतात. तुमच्या प्रतिकारशक्तीला याचा जोरदार फटका बसतो आणि शरीर परिणामकारकरित्या याचा सामना करू शकत नाही. खराब आणि मर्यादित झोपेमुळे काही ठराविक आजार आणि रोग संभवतात. विशेषतः हृदयविकार, मधुमेह, अतिताण; इतकेच नाही तर ठराविक प्रकारचे कर्करोगही होऊ शकतात.

नियमितपणे पुरेशी झोप घेणे किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला आतापर्यंत कळलंच असेल. जर खरोखर तुम्हाला अनियमित झोपेचा त्रास होत असेल, तर तुमच्याच शरीरावर त्याचा सगळ्यात जास्त परिणाम होणार आहे. म्हणूनच रात्रीची चांगली झोप तुम्हाला फायदा देईलच, शिवाय तुमचे संरक्षणही करेल. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)