अपुरी झोप तुमच्या शरीरावर करते परिणाम…(भाग 2)

डॉ. प्रिती देवनानी 

आपल्याला वाटत असतं आपलं आपल्या शरीरावर पूर्ण नियंत्रण आहे, खास करून झोपायच्या आणि उठायच्या वेळांवर, पण संशोधनात हे सिद्ध झालं आहे की, हे चुकीचं आहे. भले आपण रात्री घुबडासारखे जागू शकत असू, किंवा अगदी पहाटे उठू शकत असू, परंतु याचा आपल्या जीन्सवर भयंकर परिणाम होत असतो.

पुरेशा झोपेचे चांगले फायदे 
तुम्ही लहानाचे मोठे होत असताना अनेकवेळा ऐकलं असेल, की झोपं किती महत्त्वाची आहे वगैरे. तुम्ही मोठं झाल्यावर त्याचे खरे फायदे तुम्हालाही कळले असतील. परंतु जर कळले नसतील तर मात्र तुम्ही इतर गोष्टींच्या आनंदात गुंतून जाता आणि मग झोपेबाबत तडजोड करता. असे वारंवार केल्याने, तुम्हाला झोपेशी संबंधित मेटाफोरिकल पॅंडोरा बॉक्‍ससारखे त्रास जडू शकतात. हे त्रास सुरुवातील तितकेसे गंभीर वाटणार नाहीत कदाचित, परंतु तुम्ही जसजसे वयाने मोठे व्हाल तसतसे त्याचे त्रास वाढू लागतील.

अपुरी झोप तुमच्या शरीरावर करते परिणाम…(भाग 1)

चांगली गादी आवश्‍यकच 
कोणतंही काम करण्यासाठी तुमच्याकडे योग्य साधनं असणं गरजेचं असतं. झोपणं, हे कामसुद्धा त्याला अपवाद नाही आणि चांगल्या झोपेसाठी सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे एक चांगली गादी. आपण कोणतीही गादी खरेदी केली, तरी सगळ्या गाद्या सारख्याच असतात असं तुम्हाला वाटेल, पण ते खरं नाही. गादी म्हणजे झोपण्यासाठी असलेला आडवा पृष्ठभाग नाही, तर चांगली गादी दिवसभराच्या थकव्यानंतर तुम्हाला शांत, आरामदायी झोपण्यासाठी मदत करते. एक चांगली गादी बऱ्याच बाबतीत मदत करू शकते.

एक चांगली गादी; शरीर फिट 
यामागचं विज्ञान जाणून घेऊ या. चांगली गादी तुमच्या पाठीच्या मणक्‍याच्या नैसर्गिक वळणानुसार बनवलेली असते आणि संपूर्ण शरीरावर ताणाचे एकसारख्या प्रमाणात विभाजन करणारी असते. हे महत्त्वाचे असते, कारण तुमची झोप ही तुमचे शरीर गादीवर कशाप्रकारे मावते यावर अवलंबून असते. त्यामुळे योग्य गादी घेण्याने तुम्ही झोपण्यासाठी योग्य जागा निवडता आणि पाठीच्या कण्याची नैसर्गिक स्थिती कायम राहाते.

झोपण्याच्या शैलीलाही महत्त्व 
तुमच्या झोपण्याची जागा आवडीनुसार बनवताना झोपण्याच्या शैलीनुसार गादी बनवणंही तितकंच महत्त्वाचं असतं. उदा. पोटावर झोपणाऱ्यांना कुशीवर किंवा पाठीवर झोपणाऱ्यांच्या तुलनेत त्यांच्या शरीरासाठी जास्त आधाराची गरज असते, म्हणजे त्यांची कंबर अवघडून दुखत नाही. तर कुशीवर झोपणाऱ्यांना गादी खूप टणक असून चालत नाही, नाहीतर पुरेसा आधार मिळण्यासाठी ते नकळतपणे उलटसुलट झोपण्याची शक्‍यता असते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)