अपात्र सदस्यांच्या पुनरागमनानंतर हिंजवडीत विकासकामे

हिंजवडी-सदस्य अपात्रतेच्या ग्रहणातून मुक्तता झाल्याने हिंजवडी ग्रामपंचायतच्या कारभारास पुन्हा नव्याने सुरवात झाली आहे. तब्बल 2 वर्षे प्रशासकाच्या अंमलाखाली असलेल्या हिंजवडी ग्रामपंचायतच्या सदस्यांनी जोरदार पुनरागमन करत पहिल्याच मासिक सभेत 7 कोटी रकमेच्या विविध विकासकामांना मंजुरी दिली आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये सकारात्मक आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.
गायरानात अतिक्रमण केल्याप्रकरणी ग्रामपंचायतच्या एकूण 17 पैकी 8 सदस्यांना अपात्र ठरवण्यात आले होते. यानंतर न्यायालयीन लढा सुरू झाला. अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेल्या या लढ्याला 8 जागांवर लागलेल्या पोटनिवडणुकीच्या तोंडावरच यश मिळाल्याने 5 जागा पुनर्गठित झाल्या व उर्वरीत 3 जागांवर पोटनिवडणुक झाली. पोटनिवडणुकीसाठी ईव्हीएमही तयार झाल्या असताना सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्याने प्रशासकीय यंत्रणेला 5 जागांची पोटनिवडणूक रद्द करण्याची कार्यवाही करावी लागली. त्यामुळे मोठ्या नाट्यमय घडामोडीत हिंजवडी ग्रामपंचायतच्या सदस्यांचे पुनरागमन झाले. सदस्यत्त्व अपात्र ठरलेल्या ग्रामपंचायत सदस्य जयमाला हुलावळे, सागर साखरे, राहुल जांभुळकर, रेखा साखरे आणि श्रीकांत जाधव यांनी हा लढा जिंकला. उर्वरित 3 जागांवर पोटनिवडणूक होऊन तानाजी साखरे, आरती जांभुळकर व आशा हुलावळे हे तिघेजण नव्याने निवडून आले आहेत. त्यामुळे पहिल्याच मासिक सभेत हिरीरीने सहभाग घेत गावाच्या दृष्टीने विकासात्मक पाऊल उचलत गजबलेल्या सभागृहात कोट्यवधींची विकासकामे मंजूर करण्यात आली.
विकासकामांना बसलेली खीळ मोडण्यात ग्रामदैवत म्हातोबाने कौल दिला असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळेच ग्रामदैवत म्हातोबाच्या नावाने चांगभलं करत म्हातोबा देवस्थानच्या सुशोभिकरणासाठी 1 कोटी इतक्‍या खर्चास मंजुरी देण्यात आल्याची माहिती माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य सागर साखरे यांनी दिली. हिंजवडीच्या स्मार्ट विकासाबरोबर पारंपरिक परंपरेला जोपासण्याचा व हिंजवडीच्या वैभवात भर घालण्याचा प्रयत्नही सर्व पदाधिकारी मनापासून करणार असल्याची पुष्टी साखरे यांनी व्यक्त केली.

  • ही होणार विकासकामे
    प्रायोगिक तत्वावर प्रभाग क्र. 3 व 4 स्मार्ट प्रभाग बनवणार
    अंतर्गत रस्ते, पाईपलाईन, ड्रेनेज, पथदिवे, पाणी अशा सोयीं अंतर्भूत असणार
    कचरामुक्त वॉर्डचे लक्ष्य
    महिलांसाठी बहुउद्देशीय अस्मिता भवन आणि तरूणांसाठी व्यायामशाळा
    नाना-नानी पार्क संकल्पना मांडली असून ती सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करणार
    पाणंद रस्ते खुले करणार
    हिंजवडीच्या वैभवात भर घालणाऱ्या म्हातोबा देस्वस्थानच्या सुशोभिकरणासाठी 1 कोटी रु. खर्च करून टेकडी परिसर विकसित करणार

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)