भेट न झाल्याने महसूलमंत्र्यांना घातले साकडे

पुणे – महापालिका निवडणुकीनंतर जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न सादर केल्याने भाजपच्या पाच नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलावर आहे. त्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहेत. यावर तोडगा काढण्याचे साकडे घालण्यासाठी या नगरसेवकांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मुंबई गाठली. मात्र, मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्याने महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांची भेट घेऊन हे नगरसेवक परतले.

महापालिका निवडणुकीनंतर सहा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने 7 जणांचे नगरसेवक पद धोक्‍यात आले असून ज्यात भाजपचे 5 जण आहेत. त्यांची माहिती आयुक्तांनी नगरविकास विभागाला पाठविली आहे. ही माहिती मिळाल्याने त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या काही नगरसेवकांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी थेट मुंबईला धाव घेतली. मात्र, त्यांना मुख्यमंत्र्याची भेट न मिळाल्याने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन या नगरसेवकांनी यावर तोडगा काढण्याची विनंती केली. त्यावर पाटील यांनी “जातवैधता प्रमाणपत्राअभावी पदे धोक्‍यात आलेल्या राज्यातील हजारो लोकप्रतिनिधींना दिलासा देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासंबधीचा प्रस्ताव पुढील आठवड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकित येणार असून त्यामुळे पदे धोक्‍याता आलेल्यांना दिलासा मिळेल,’ असे स्पष्ट केले. त्यामुळे आमचा पदांना धोका नसल्याची माहिती यातील काही नगरसेवकांनी दिली.

कायद्यात बदलाच्या हालचाली
या नगरसेवकांसाठी कायद्यात बदल करण्याच्या हालचाली सुरू असून घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगत दिलासा देण्यात आला आहे. दरम्यान, शासनाने कायद्यात दुरूस्ती केली, तरी त्याचा फायदा पुढील निवडणुकीपासून होणार आहे. त्यामुळे शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा दिलासा या प्रतिनिधींना मिळणार का, याबाबत शंका उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)