अपहार प्रकरणी निवृत्त अभियंत्यांवर गुन्हा दाखल

सातारा,दि.29 प्रतिनिधी- पाणी वाटपाच्या परवान्यात साडे अकरा लाख रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी निवृत्त शाखा अभियंता व्ही.पी. वल्सन यांच्यावर वडुज, ता.खटाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यम प्रकल्प उपविभाग-9 मध्ये 2011 ते 2015 या कालावधीत हा अपहार करण्यात आला आहे. निवृत्त शाखा अभियंता व्ही.पी. वल्सन यांनी सहाय्यक अभियंत्यांच्या सही आणि शिक्‍क्‍याचा वापर करून शेतकऱ्यांना बनावट परवाने देवून संबधित कागदपत्रे गायब केली होती. परवान्यांसाठी घेतलेल्या 2 लाख 41 हजार रूपये शासनाला जमा न करता अपहार केला आहे. त्याचप्रमाणे इतर 32 शेतकऱ्यांना परवाना देण्यासाठी 9 लाख 5 हजार रूपये घेवून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आल्याने निवृत्त शाखा अभियंता व्ही.पी. वल्सन यांच्या विरोधात उपविभागीय अभियंता विलास किसन पाटील यांनी वडुज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शेलार करित आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)