अपहरण केलेल्या 11 महिण्याच्या मुलाची सुखरुप सुटका

वारजे पोलिसांनी महिलेला बार्शी येथून केले जेरबंद
पुणे,दि.10- वारजे येथून अपहरण झालेल्या 11 महिण्याच्या मुलाची सुटका वारजे पोलिसांनी केली आहे. या मुलाचे अपहरण करणाऱ्या महिलेस मुलासह बार्शी रेल्वे स्थानकातून ताब्यात घेण्यात आले. मुल होत नसल्याने तीने शेजारी रहाणाऱ्या महिलेच्या मुलाचे बिस्कीट खायला देण्याचे आमिष दाखवून अपहरण केले होते.
पोलिसांनी याप्रकरणी रोहिणी उर्फ राजश्री विष्णु झोंबाडे (रा.हनुमानमंदिराजवळ, वारजे) या महिलेला अटक केली आहे. तर श्रेयस सुरेंद्र भारती(11 महिने) असे मुलाचे नाव आहे.
विवाहानंतर मुल होत नसल्याने आरोपी रोहिणी हिने शेजारी रहाणाऱ्या मनिषा सुरेंद्र भारतीबरोबर ओळख वाढवली होती. यातूनच ती मुलाबरोबर खेळायची व त्याला लळा लावत होती. दोन दिवसांपूर्वीच तीने मुलाची आई पाणी भरायला गेली असता, मी मुलाचा जवळच्या दुकानात बिस्कीट खायला देते तुम्ही पाणी भर असे म्हणत मुलाला घेऊन गेली. मुलाच्या आईने बराच वेळ तीची शोधा शोध केली मात्र आरोपी महिला सापडली नाही. ती रात्रीही घरी परतली नसल्याने अखरे वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर तातडीने गुन्हयाचा तपास हाती घेऊन आरोपी महिलेला मुलासह जेरबंद करण्यात आले. आरोपी महिला मागील वर्षभरापासून मुलाला पळवून नेण्याची संधी शोधत होती
यासंदर्भात माहिती देताना पोलीस उपनिरीक्षक राज क्षिरसागर यांनी सांगितले, आरोपी महिलेचा सात वर्षापूर्वी विवाह झाला आहे. तर ती दोन ते तीन वर्षापासून एकटी रहात आहे. ती कचरा वेचून स्वत:चा उदरनिर्वाह करते. तर फिर्यादी महिलेचा पती पेटींगची कामे करतो. विवाहानंतर मुल न झाल्याने तीने श्रेयसला पळविण्याचा प्लॅन आखला होता. त्याला बिस्कीट देण्याच्या बहाण्याने पळवल्यावर तीने रेल्वेने बार्शी गाठले. तीथे रेल्वे स्थानकातच तीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)