पुणे : अपहरण करून जीवे मारण्याची धमकी

सहा ते सात जणांविरोधात गुन्हा दाखल

पुणे – तरुणाचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना दत्तवाडी येथील गजानन महाराज चौकात घडली. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात सहा ते सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सुधीर अशोक शिंदे (32, महात्मा फुले वसाहत, लक्ष्मीनगर) याला अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी 21 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी हा त्याच्या मित्रासह सहकारनगर येथील नाईन ग्रीन पार्क समोरील बांधकाम साईट पाहण्यासाठी सोमवारी दुपारी आला होता. यानंतर तो घरी जात असताना सुधीर शिंदे व त्याच्या इतर साथीदारांनी तुम्ही इथे काय करता, येथील साईटवर कशाला आला असा जाब विचारला. यानंतर जबरदस्तीने त्यांच्या गाडीवर बसवून तुळशीबागवाले कॉलनी, तीन हत्ती चौक येथे नेऊन त्यांना शिवीगाळ व लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक प्रणिता हजारे तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)