जेजुरी- रोमणवाडी (ता. पुरंदर) येथील अकरा वर्षांच्या मुलाच्या अपहरणानंतर चोवीस तासात त्याची सुटका करण्यात जेजुरी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
सचिन उर्फ पप्पू संपत रोमन (रा. रोमणवाडी, पांडेश्वर) या आरोपीला जेजुरी पोलिसांनी अटक केली आहे. जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर पांडेश्वर येथून रोमणवाडी येथे सायकलवर जात असताना आरोपीने खाऊचे आमिष दाखवून मुलाचे अपहरण केले. बऱ्याच वेळ शोध घेतल्यानंतर ही मुलगा मिळत नसल्यामुळे नातेवाईकांनी मध्यरात्री जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
त्यानुसार जेजुरी पोलिसांनी यवत परिसरात सापळा रचून आरोपीला पकडले. त्यानंतर संबंधित मुलाला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबतची फिर्याद रवींद्र गोविंद धुमाळ (वय 45, रा. रोमणवाडी) यांनी दिली होती. पैशांसाठी आरोपीने अपहरण केल्याचे जेजुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अंकुश माने यांनी सांगितले. सहाय्यक पोलीस निरिक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली रणजीत निगडे, आपा पडयाळ, महेश उगले यांच्या पथकाने ही कारवाई केली. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक विजय वाघमारे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)