अपहरणाचा बनाव तरुणाच्या अंगलट

पिंपरी – मित्रांचे उसने पैसे परत देण्यासाठी एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला. अपहरणाचे मेसेज पाठविण्यासाठी त्याने रेल्वे प्रवासात एक मोबाईलही चोरला. मात्र पोलिसांनी त्याचा हा बनाव उघडकीस आणला.

विनय राजेंद्र चव्हाण (वय-22, रा. गंधर्वनगरी, मोशी) असे अपहरणाचा बनाव रचणाऱ्या तरुणाचे नाव आहे. पोलीस उपायुक्‍त स्मार्तना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनय घरातून बेपत्ता झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने चोरीच्या मोबाईलवरुन आवाज बदलून फोन केला. तुमच्या मुलाचे अपहरण झाल्याचे सांगत दीड लाख रुपयांची खंडणी मागितली. पोलिसांना कळविल्यास तुमच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या त्याच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली.

-Ads-

त्यानुसार, एमआयडीसी पोलीस ठाणे आणि खंडणी विरोधी पथक कामाला लागले. तांत्रिक विश्‍लेषणाच्या आधारे अपहरणकर्ते मुंबईत असल्याचे समोर आले. यामुळे दोन पथके मुंबईला रवाना झाली. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनल्सवर विनय चव्हाण याला शुक्रवारी (दि. 30) पहाटे ताब्यात घेत अपहरणाचा बनाव उघडकीस आणला.
पोलीस उपायुक्‍त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्‍त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ सुधीर अस्पत, राजेंद्र कुंटे, सहायक निरीक्षक विठ्ठल साळुंखे, उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे, विठ्ठल बढे, कर्मचारी रवींद्र तिटकारे, दीपक महाजन, स्वप्नील लांडगे, प्रसाद कलाटे, नवनाथ पोटे, करण विश्‍वासे, विशाल काळे, महेश खांडे, सागर शेडगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)