पुणे: अपयश झाकण्यासाठीच सरकारला आणीबाणीची आठवण

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे जेटलींना प्रत्युत्तर

पुणे – “गेल्या चार वर्षांत आलेल्या अपयशावरील लक्ष विचलित करण्यासाठी 43 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता आणीबाणी आठवत आहे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना टोला लगावला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीची तुलना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकतीच ऍडॉल्फ हिटलरच्या राजवटीशी केली होती. त्यावर शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अखिल भारतीय मराठी शिक्षण परिषदेच्या राजर्षि शाहू अकॅडमीतर्फे आयोजित छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती समारंभानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, “गेल्या चार वर्षांत आलेल्या अपयशावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आता 43 वर्षांनंतर आणीबाणी आठवत आहे. अटलबिहारी वाजपेयींच्या काळात आणबाणीची कधी आठवण आली नव्हती,’ याकडे पवार यांनी लक्ष वेधले.

“हिटलरलाही मागे टाकत इंदिरा गांधी यांनी राज्यघटनेचा विकृत वापर करुन देशातील लोकशाहीत घराणेशाहीची मुहूर्तमेढ रोवली,’ असा आरोप जेटली यांनी केला होता. आणीबाणीच्या 43 व्या वर्षदिनानिमित्त जेटली फेसबुकवरील ब्लॉगमधून तीन भागांत आपले विश्‍लेषण मांडत आहेत. यापैकी दुसऱ्या भागात जेटली यांनी “आणीबाणीचा 19 महिन्यांचा कालखंड 1933 मधील नाझी जर्मनीमधील हिटलरशाही मिळताजुळता होता. हिटलर व इंदिरा गांधी या दोघांनी आपापल्या देशांच्या राज्यघटनांचा वापर करुन लोकशाही राज्यव्यवस्थेस हुकूमशाहीत परिवर्तित केले. फरक एवढाच की राज्यघटनेचा सोईस्कर वापर करुन हिटलरने एका व्यक्तीची हुकूमशाही राजवट राबविली. याउलट इंदिरा गांधी यांनी भारतातील लोकशाही व्यवस्थेला घराणेशाहीचे स्वरुप दिले’ असे आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)