अपघात विरीहित सेवा देणाऱ्या 338 चालकांना बक्षीस

नगर – जिल्ह्यातील विना अपघात सेवा देणाऱ्या 338 चालकांना राज्य परिवहन महामंडळाकडून प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाणार असून, महाराष्ट्र दिनी बक्षिसाच्या रकमेचे वितरण केले जाणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेत एक वर्षात 260 दिवस विना अपघात सेवा देणाऱ्या वाहकांना 1 हजार रुपये आणि एक वर्षापेक्षा जास्त दिवसांत विना अपघात सेवा देणाऱ्या चालकांना 600 रुपये दिले जातात. या वर्षी नगर विभागात 338 चालकांनी विना अपघात सेवा दिली आहे. यापैकी 225 चालक एक हजार रुपये व 113 चालक 600 रुपये बक्षीसास पात्र ठरले आहेत. नगर विभागात एकूण 2 लाख 92 हजार इतक्‍या बक्षीस रकमेचे वाटप केले जाणार आहे. या योजनेस चालकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)