अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा

पुणे-नाशिक महामार्ग पोलीस उपनिरिक्षक दीपक सप्रे यांचे आवाहन

मंचर- वाहन चालविताना नियमांचे पालन केल्यास अपघाताची संख्या झपाट्याने कमी होईल. दारु पिऊन वाहन चालविल्यास अपघात होतात. हे माहित असूनही अनेकजण दारु पिऊन वाहन चालवितात. रात्रीच्या वेळी डिफरचा वापर करावा तसेच ऊसाने भरलेली वाहने घेऊन जात असताना ओव्हरटेक करणे टाळा अशा सर्व नियमांचे पालन केल्यास अपघात टाळण्यास मदत होईल, असे मत पुणे-नाशिक महामार्ग पोलीस उपनिरिक्षक दीपक सप्रे यांनी व्यक्त केले.
दत्तात्रयनगर-पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर पुणे-नाशिक महामार्ग वाहतूक पोलीस व कारखान्याच्या वतीने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्‍टर व टायरगाड्यांना रेडियम बसवून वाहन मालक व चालकांना वाहन सुरक्षेबाबत व अपघात कमी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, पर्चेस अधिकारी ब्रिजेश लोहोट, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे समवेत ऊस वाहतूक वाहन मालक, चालक उपस्थित होते.
सुप्रे म्हणाले की, वाहन चालविताना वाहन परवाना जवळ ठेवा, वाहन परवान्याचे वेळोवेळी नुतनीकरण करा, वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र व विमा असल्याबाबत खात्री करा आदी नियमांचे पालन केल्यास वाहन अपघात टाळण्यास मदत होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)