अपघाती क्षेत्रातच रुग्णवाहिका मिळेना…!

अनेकांचा उपचाराअभावी मृत्यू; 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची मागणी

उमेश सुतार

50 गावे, 20 आरोग्य उपकेंद्र
मसूर प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात सुमारे 50 गावे, 3 आरोग्य केंद्र व 20 उपकेंद्रे आहेत. मसूर येथे 108 क्रमांकाची रुग्णवाहिका मिळाल्यास पुसेसावळी, कोपर्डे, उंब्रज, हेळगाव, किवळ याठिकाणी 15 ते 20 मिनिटात आरोग्य सेवा मिळू शकेल. सध्या ही सेवा एक तासानंतर मिळत आहे.

उत्तरेतील अपघाती ठिकाणे

-कराड ते मसूर मार्गावरील कारखाना परिसर

-मसूर ते उंब्रज मार्गावरील वडोली भिकेश्वर
-मसूर ते पुसेसावळी मार्गावर शामगाव घाट
-मसूर ते रहिमतपूर मार्गावर तारगाव फाटा
-कराड-विटा मार्गावरील सुर्ली घाट

कराड – कराड उत्तरेतील मसूर परिसरात अरुंद रस्त्यासह अनेक ठिकाणी असणारी धोकादायक वळणे अपघाताला निमंत्रण देत आहेत. यामुळे या रस्त्यावरुन प्रवास करताना समोर कधी काळ उभा राहिल हे सांगणे अशक्‍यच आहे. अशावेळी तात्काळ एखादी रुग्णवाहिका उपलब्ध होणे गरजेचे असते. मात्र, ऐनवेळी रुग्णवाहिकाच उपलब्ध होत नसल्याने जखमींचा उपचाराअभावी मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. यासाठी या प्रमुख रहदारीच्या रस्त्यावर तातडीची सेवा पुरविणारी रुग्णवाहिकेची सोय करावी, अशी मागणी जनतेमधून होत आहे.

कराड उत्तरेकडील मसूर परिसर हा राजकिय व सर्व क्षेत्रासाठी महत्वाचा भाग म्हणून गणला जातो. या भागात हजारोंची लोकसंख्या असलेली अनेक गावे, वाड्या-वस्त्या आहेत. प्रत्येक गावास रस्ते आहे. याच भागात सुर्ली व शामगावचा घाट येतो. या घाटापासून कराडपर्यतचा प्रवास लक्षात घेता या मार्गावर अनेक ठिकाणी अपघाती धोकादायक वळणे असलेली पहावयास मिळतात. काही ठिकाणी असलेले अरुंद रस्ते थेट अपघाताला निमंत्रण देत आहेत. तर काही ठिकाणी रस्त्यावरील खड्ड्युांमुळे वाहनधारकांना अपघाताचा सामना करावा लागत आहे. शामगाव व सुर्ली घाटातही अनेकदा गंभीर स्वरुपाचे अपघात झालेले आहेत.

यामार्गावर एखादी अपघाताची घटना घडल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ त्यांच्या परीने जखमींना मदत करतात. जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी ते रुग्णवाहिका मिळविण्याचा प्रयत्न करतात. शासनाने तातडीची सेवा म्हणून 108 क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली आहे. मात्र ही रुग्णवाहिका कराड व उंब्रज येथे आहे. ग्रामस्थांनी 108 क्रमांकाला फोन करुन रुग्णवाहिकेची मागणी केल्यास याबाबत उंब्रज किंवा कराडला कळविले जाते. मात्र, ऐनवेळी या दोन्ही ठिकाणच्या रुग्णवाहिका उपलब्ध होत नाहीत. तसेच इतर रुग्णालयांच्या गाड्याही वेळेत त्याठिकाणी पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या खासगी वाहनांचा आधार घेऊन ग्रामस्थ जखमीला रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतात. मात्र काही वेळा जखमीवर वेळेत उपचार न झाल्याने त्याला जीव गमवावा लागतो. ही वस्तुस्थिती आहे.

कराड तालुक्‍यात 108 क्रमांकाच्या 5 गाड्या
कराड तालुक्‍यासाठी 108 क्रमांकाच्या 5 रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. त्यामधील चार रुग्णवाहिका कराड दक्षिणमध्ये आहेत. तर एक रुग्णवाहिका कराड उत्तरेतील तालुक्‍यातील गावांसाठी आहे. दक्षिणेत उपजिल्हा रुग्णालयात 1, मलकापूर नगरपंचायतीकडे 1, कृष्णा रुग्णालयाकडे 1 तर उंडाळे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे 1 रुग्णवाहिका आहे. कराड उत्तरमध्ये फक्त उंब्रज येथे एक रुग्णवाहिका कार्यरत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)