अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराच्या कुटुंबियांना 10 लाख 30 हजार रूपये नुकसान भरपाई

पुणे- स्कूल बसची धडक बसून झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराच्या कुटुंबियांना 10 लाख 30 हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाने दिला आहे. मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे सदस्य ए. व्ही. रोट्टे यांनी हा आदेश दिला आहे. महावीर रावसाहेब थनांबीर (वय 39) यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी 25 लाख रूपये नुकसान भरपाई मिळावी, असा दावा त्यांच्या कुटुंबियानी पोतदार एज्युकेशन ट्रस्ट आणि बजाज आलियांस जनरल इन्शुरंस कंपनी लि. च्या विरोधात दाखल केला होता. येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे हा दावा दाखल करण्यात आला होता.
महावीर हे 30 सप्टेंबर 2019 रोजी यशवंतनगरमधील अजमेरा कॉलनीसमोरून दुचाकीवरून जात होते. त्यावेळी पोतदार स्कूलची एमएच 14 बीए 8482 या नंबरची गाडी त्या ठिकाणाहून जात होते. स्कूलबसच्या चालकाने बेदरकारपणे वाहन चालवत महावीर यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघतात त्यांच्या डोक्‍याला गंभीर मार लागला होता. अपघातानंतर त्यांना पिंपरीमधील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा 3 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. त्यांच्या उपचारासाठी 2 लाख रुपये खर्च आला होता. महावीर हे एका खासगी कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला होते. त्यांना दरमहा 15 हजार रुपये पगार होता. कुटुंबांची पुर्ण जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यामुळे 25 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी कुटुंबियांनी केली होती. मात्र, न्यायालयाने दावा दाखल झाल्याच्या तारखेपासून 6 टक्‍के व्याजाने 10 लाख 30 हजार रुपये देण्याचा आदेश दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)