अपघातात मृत्यू झालेल्या कंटेनरच्या चालकाला 10 लाख 38 हजार देण्याचा न्यायालयाचा आदेश

पुणे – कंटेनरच्या धडकेत अपघाती मृत्यू झालेल्या चालकांच्या कुटुंबियांना दाव दाखल केलेल्या तारखेपासून 6 टक्के व्याजाने 10 लाख 38 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाचे सदस्य ए. व्ही. रोट्टे यांनी दिला आहे.
शैलेंद्र सत्यनारायण वर्मा (वय 28) यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे 50 लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी म्हणून वर्मा यांच्या कुटुंबियांनी राजेंद्र प्रसाद ब्रीजलाल वर्मा (वय 46, रा. मुंबई, मुळा रा. उत्तरप्रदेश), इक्‍बाल कमरुद्दीन खान (रा. हरयाना) आणि आयएफएफसीओ-टोकीयो जनरल इंन्सुरंस कंपनी लि. विरुद्द दावा दाखल केला होता. वर्मा हे 4 मे 2016 रोजी सकाळी 11 वाजता चाकण शिक्रापूर रस्त्याने कंटेनर घेवून निघाले होते. ते चावळ मळामधील नंदकिशोर हॉटेल येथे पोहचले असता विरुद्ध बाजूने येत असलेल्या एका कंटेनरने त्यांच्या कंटेनरला धडक दिली. या धडकेत वर्मा चालवत असलेल्या कंटेनरच्या केबीनचा टक्काचूर झाला होता. त्यात वर्मा गंभीर झाले होते. रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
राजेंद्र वर्मा हा धडक दिलेला कंटेनर चालवत होता. खान हा त्याचा मालक होता. तर संबंधित कंटेनरचा आयएफएफसीओ-टोकीयो जनरल इंन्सुरंस कंपनी लि.कडे विमा काढलेला होता. राजेंद्र हा बेदरकारपणे वाहन चालक होता त्यामुळे झालेल्या अपघातात वर्मा यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. शैलेंद्र वर्मा यांना दरमहा 28 हजार रुपये पगार होता. कुटुंबाची संपुर्ण जबाबदारी त्यांच्यावर होती. तसेच त्यांना दोन लहान मुले असून आई-वडील वृद्ध आहेत. त्यामुळे 50 लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी दावा दाखल केला होता. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद लक्षात घेत दावा दाखल केल्यापासून 6 टक्के व्याजाने 10 लाख 38 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, असा आदेश न्यायालयाने दिला. वर्मा यांच्या दोन्ही मुलांच्या नावावर प्रत्येक 3 लाख रुपये बॅंकेत जमा करण्यात यावे. 2 लाख रुपये पत्नीच्या नावे राष्ट्रीयकृत बॅंकेत ठेवावे आणि आई वडिलांच्या नावे प्रत्येकी एक लाख रुपये बॅंकेत जमा करावे आणि उर्वरीत रक्कम पत्नीला देण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)