अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाच्या कुटुंबीयांना 9 लाख 50 हजार

पुणे – अपघातात मृत्यू झालेल्या 22 वर्षीय तरूणाच्या कुटुंबीयांना दाखल दाव्यात 9 लाख 50 हजार रुपये मिळणार आहेत. रविवारी झालेल्या महालोकअदालतमध्ये तडजोडीअंती मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे प्रमुख सदस्य आणि सत्र न्यायाधीश आर. एच. मोहम्मद, ऍड. अतुल गुंजाळ आणि ऍड. यू. व्ही. काळे यांच्या पॅनेलने हा दावा निकाली काढला. समीर मुरलीधर औटी (वय 22, रा. राजूरी, ता. जुन्नर), असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. औटी हा दि. 14 ऑक्‍टोबर 2016 रोजी दुचाकीवरून कल्याण – नगर रस्त्याने चालला होता. त्यावेळी राजुरी गावच्या हद्दीत समोरून आलेल्या स्वीफ्ट कारने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात औटी याचा मृत्यू झाला. तो अविवाहित होता. एका इलेक्‍ट्रीकल्स दुकानात कामाला होता. त्याला दरमहा 9 हजार रुपये पगार होता. या पार्श्‍वभूमीवर त्याची आई मंदाकिनी, वडिल मुरलीधर यांनी 10 लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, यासाठी ऍड. अतुल गुंजाळ यांच्यामार्फत दावा दाखल केला होता. स्वीफ्ट कारची विमा कंपनी असलेल्या न्यू इंडिया इन्श्‍युरन्स कंपनीच्या विरोधात येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे हा दावा दाखल करण्यात आला होता. रविवारी झालेल्या महालोकअदालतमध्ये तडजोडीअंती 9 लाख 50 हजार रुपये देत हा दावा निकाली काढण्यात आला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)