अपघातात महेश तोरडमल या युवकाचे निधन

मिरजगाव – नगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मिरजगाव येथील श्रीरामनगर (कर्जत फाटा) जवळ कंटेनरची मोटारसायकलला जोरदार धडक बसल्याने येथील व्यावसायिक व राजकीय युवा नेता महेश महादेव तोरडमल (वय 22) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सकाळी नऊ वाजता झाला.

मिरजगाव येथील श्रीरामनगर (कर्जत फाटा) येथे नगर-सोलापूर महामार्गावर नगरहून सोलापूरकडे जाणाऱ्या कंटेनरची (क्रमांक एच आर. 38 यू.1592) मोटारसायकलला धडक बसली. घरामधून दुकानाकडे तोरडमल सकाळी नऊच्या सुमारास निघाले होते. त्यावेळी कंटेनरची मोटारसायकलला धडक बसल्याने तोरडमल हे जागीच ठार झाले. अपघात एवढा जोराचा होता की प्रत्यक्षदर्शींच्या काळजाचा ठेकाच चुकला.

अपघात घडताच कंटेनरचालक फरार झाला आहे. किशोर रखमाजी तोरडमल यांच्या फिर्यादीवरून मिरजगाव दूरश्रेत्रामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)