अपघातात अपंगत्व आलेल्या व्यक्‍तीला 24 लाख 50 हजार रुपये नुकसानभरपाई

पुणे -अपघातात उजवा हात गमावा लागलेल्या व्यापाऱ्याला रविवारी झालेल्या महालोकअदालतमध्ये दिलासा मिळाला आहे. मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दाखल असलेला दावा तडजोडीअंती 24 लाख 50 हजार रुपये देत निकाली काढण्यात आला. सत्र न्यायाधीश एस. एम. मेनजोगे यांच्या पॅनेलने हा दावा निकाली काढला.
संदीप बजीरंग गावडे (वय 38, राजगुरूनगर), असे त्या व्यापाऱ्याचे नाव आहे. गावडे हे खेड मार्केट यार्डामध्ये व्यापार करतात. दि. 22 फेब्रुवारी रोजी ते चाकण परिसरातून दुचाकीवरून चालले होते. एका चौकात सिग्नलवर थांबले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर पडले. त्यानंतर ती ट्रक त्यांच्या उजव्या हातावरून गेली. परिणामी उजवा हात खांद्यापासून निकामी झाला. या पार्श्‍वभूमीवर नुकसानभरपाई मिळावी, यासाठी गावडे यांनी ऍड. अनिल पटणी आणि ऍड. अशिष पटणी यांच्यामार्फत येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता. गावडे यांचे वय 38 आहे. त्यांना आलेल्या अपंगत्वाचा विचार करून जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी, असा दावा ऍड. पटणी यांनी येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दाखल केला होता. ट्रकची विमा कंपनी असलेल्या ओरिएंटल इन्श्‍युरन्स कंपनीच्या विरोधात हा दावा दाखल करण्यात आला होता. रविवारी झालेल्या महालोकअदालतमध्ये 24 लाख 50 हजार रुपये देत तडजोडीअंती हा दावा निकाली काढण्यात आला. तडजोडीसाठी ऍड. अनिल पटणी आणि ऍड. अशिष पटणी आणि ओरिएंटल विमा कंपनीच्या विभागीय व्यवस्थापक जोशी मॅडम यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)