अपघातात अज्ञात दुचाकीस्वाराचा मृत्यू

वाकड – मालवाहतूक करणाऱ्या कंटेनरखाली सापडून एका अज्ञात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात आज (गुरुवारी) दुपारी एकच्या सुमारास कात्रज-देहूरोड बायपास रोडवर भुमकरवस्ती भुयारी मार्गात झाला.

याबाबतची माहिती अशी की, दुचाकीस्वार आणि कंटेनर (एमएच 06 / एक्‍यू 5944) एकाच दिशेने हिंजवडी आयटी पार्ककडून डांगे चौकाकडे जात होते. भुमकरवस्ती भुयारी मार्गातून जात असताना वळणावर दुचाकीस्वार कंटेनरच्या मागच्या चाकाखाली सापडून ठार झाला. घटनेनंतर कंटेनर चालक स्वतः हिंजवडी पोलीस ठाण्यात हजर झाला. चालकाने घटनेची संपूर्ण माहिती हिंजवडी पोलिसांना दिली. दुचाकीस्वाराची ओळख अद्याप पटली नाही. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)