अपघातातून बचावासाठी हेल्मेट आवश्‍यक

उपनिरीक्षक विजय जगदाळे ः खराबवाडीत कामगारांना हेल्मेटवाटप

महाळुंगे इंगळे-भरधाव दुचाकीवरून रस्त्याने प्रवास करताना अपघात होण्याचा दाट संभव असल्याने अपघातातून बचाव होण्याकरिता हेल्मेट वापरणे अत्यंत आवश्‍यक असल्याचा मोलाचा सल्ला पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे यांनी दिला.
खराबवाडी (ता. खेड) येथील सुजाण कुपर प्रा. लि. या कंपनीच्या कामगारांना राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे यांच्या हस्ते हेल्मेटचे वाटप करण्यात आले, त्यावेळी मार्गदर्शन करताना जगदाळे बोलत होते. सुजाण कंपनीच्या वतीने प्रतिवर्षी राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले जाते. याही वर्षी या सप्ताहानिमित्त कंपनीमध्ये कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी घोषवाक्‍य, निबंध, पोस्टर व प्रश्नमंजुषा आदि स्पर्धा घेण्यात आल्या. याचा शुभारंभ जगदाळे यांच्या हस्ते कामगारांना हेल्मेट वाटप करून करण्यात आला. यावेळी कंपनीतील कामगारांना सुरक्षा विषयक शपथ देऊन डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग प्रशिक्षण देण्यात आले. याप्रसंगी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश पवार, पोलीस हवालदार निखील वरपे, वीरसेन गायकवाड, संदीप सोनवणे, कंपनीचे प्रशासकीय व्यवस्थापक योगेश म्हस्के, मनुष्यबळ प्रमुख हनुमंत खेंगरे, सुरक्षा अधिकारी महेंद्र काजारी आदींसह कंपनीचे अधिकारी, कामगार, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजय जगदाळे म्हणाले, रस्त्याने प्रवास करताना हेल्मेट वापरणे अत्यंत गरजेचे आहे. रस्त्याने कोणती घटना कशी आणि कधी होईल, याचा थांगपत्ता लागणार नसल्याने अपघातातून बचाव होण्याकरिता हेल्मेट वापरणे अत्यंत आवश्‍यक आहे. रस्त्यावर वाहन चालविताना कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये, यावेळी वरील मान्यवरांनीही आपले विचार व्यक्त केले. हनुमंत खेंगरे यांनी सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)