अपघातातील मृत मुलाच्या अपंग पालकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे अपघातात मृत्यू झालेल्या 10 वर्षीय मुलाच्या अपंग पालकांना 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीने केली आहे. मागच्या आठवड्यात नाशिक फाटा उड्डाण पुलावर प्रतिक सावंत याचा मिनी बसने धडक दिल्याने मृत्यू झाला.

हा अपघात येवढा भयानक होता की, प्रतिकचे शीर शरीरापासून वेगळे होवून दूर पडले. त्याचे आई-वडील अपंग असून बांधकाम मजूर आहेत. ते भाड्याने पिंपळे-गुरव येथे राहतात. त्यांची एक मुलगी शाळेत शिकते. आई-वडिलांना मुलाकडून खुप अपेक्षा होत्या; परंतु महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे व कर्तव्यातील कसूरतेमुळे प्रतिकचा मृत्यू झाला व त्याच्या आई-वडिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. अती वेगामुळे येथे अनेक अपघात होत असल्याचे स्थानिकांनी महापालिकेला अनेकदा लेखी कळवले, तरीही उपाय-योजना न केल्याने आज हे अपंग दाम्पत्य निराधार व पोरके झाले. आयुक्‍तांनी जबाबदारीचे व मानवतेचे भान ठेवावे व विशेष बाब म्हणून तातडीने संबंधित पालकांना एक कोटी रुपयांचे अर्थसहाय्य द्यावे, अन्यथा तर महापालिकेच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून मानवी हक्‍क आयोग व न्यायालयात दाद मागू, असे नागरी हक्क सुरक्षा समितीने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)