अपघाताचे प्रमाण वाढले

मंचर- मंचर-शिरुर रस्त्यावरील आंबेगाव तालुक्‍यातील अवसरी खुर्द गावानजीक डिंभा उजवा कालव्याच्या पुलाचा कठडा दोन वर्षांपासून तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे पुलावार वारंवार अपघात होत आहेत. जलसंपदा विभागाने पुलाचा कठडा लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी वाहनचालकांसह ग्रामस्थांनी केली आहे.
पुणे-नाशिक रस्त्यावरील अवसरी फाट्या येथून डिंभा उजवा कालवा जात आहे. हा कालवा मंचर-शिरुर रस्ता ओलांडुन जात असल्याने कालव्यावर जलसंपदा विभागाने पुल बांधलेला आहे. दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात खाजगी दुधाचा टॅंकर पुलाचा कठडा तोडून कालव्याच्या पाण्यात पडला होता. तेव्हापासून या पुलाचा कठडा तुटलेल्या अवस्थेत अद्याप तसाच आहे. या परिसरात रात्रीच्या वेळी अंधार असतो. त्याचप्रमाणे तेथील रस्त्याला उतार असल्यामुळे वाहन चालकांच्या कठडा तुटल्याचे लक्षात येत नसल्यामुळे रात्रीच्या वेळी वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे डिंभा उजवा कालव्याचा तुटलेला कठडा दुरुस्त करावा, अशी मागणी वारंवार करुनही कार्यवाही होत नसल्याने वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)