अपघातप्रवण क्षेत्राच्या विकासासाठी 20 हजार कोटी रूपये – गडकरी

नवी दिल्ली: देशभरातील अपघात प्रवण क्षेत्रातील रस्तेविकासासाठी केंद्र सरकारने 20 हजार कोटी रूपये खर्चाची योजना आखली असून तेथे ही रस्ते विकास व दुरूस्तीची कामे करून लोकांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते बांधणी व विकास खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. निसान इंडिया लि आणि सेव्ह लाईफ फाऊंडेशनच्या एका संशोधन अहवालाचे प्रकाशन आज गडकरी यांच्या हस्ते झाले त्यावेळ ते बोलत होते.

ते म्हणाले की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होतात तेथे भूमीगत रस्ते उभारणे किंवा तेथे फ्लायओव्हर ब्रिज बांधणे अशी कामे करण्याची गरज असून ती झाली तर तेथील अपघाताचे प्रमाण कमी होईल. अशा प्रकारची वीस हजार कोटी रूपये खर्चाची कामे सरकारने हाती घेतली आहेत असे त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रस्तावरील अपघातात दरवर्षी किमान एक लाख लोक मरतात. हे प्रमाण कमी करायचे असेल तर लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती करण्याची गरज आहे आणि वाहन चालकांचे परवाने देतानाहीं योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. राज्य सरकारांनी प्राथमिक शाळांच्या पुस्तकातही रस्ते अपघात टाळण्याच्या संबंधात काही धडे समविष्ट केले पाहिजेत अशी सूचनाही आम्ही राज्यांना केली आहे असे गडकरी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)