सातारा,दि.8 (प्रतिनिधी)
बेजबाबदारपणे वाहन चालवुन अपघाताला कारण ठरल्याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झालेला चालक हा नाकोडा कंपनीच्या रत्नागिरी ते पुणे जाणाऱ्या बसचा तो चालक आहे. नाकोडा ट्रॅव्हल्स कंपनीची रत्नागिरी पुणे बस पुण्याच्या दिशेने निघाली होती. बस पुणे बेंगलोर महामार्गावर लिंब गावच्या हद्दीत आली असता, चालक समोरील वाहनाला ओव्हरटेक करत होता. त्यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पुढील वाहनाला ट्रॅव्हल्स पाठीमागुन धडकली. यात दोन प्रवाशी किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी सुशांत सुनिल कांबळे (वय,,रा. किसोळे,ता.पाटण) याने सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)