अपघातग्रस्त गाय-वासराला जीवदान

भोसरी – प्राणी मित्रांमुळे भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली अपघातामुळे जखमी झालेल्या गाय व वासराला जीवदान मिळाले.

एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गाय व तिचे वासरु उड्‌डाणपुलाखाली जखमी होवून पडले होते. एका नागरिकाने प्राणी मित्र विक्रम भोसले यांना फोनवरुन याबाबत माहिती दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानुसार विक्रम भोसले यांनी संतोष कबाडे, निता पंडित, डॉ. दत्तात्रय कांबळे, पांडूरंग झाडे, भराणी धरण, शुभम हुले यांची मदत घेत घटनास्थळी धाव घेतली. गाय व वासरावर याठिकाणी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना पांजरपोळ येथील गो शाळेत पाठवण्यात आले. आता गाय व वासराची प्रकृती स्थिर असल्याचे विक्रम भोसले यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)