अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

लोणी काळभोर- एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती एकाच वेळी नदीच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना अतिशय दुर्दैवी असून या संकटाच्याप्रसंगी आपण सर्वांनी या कुटुंबाच्या पाठिशी रहाणे गरजेचे आहे, असे मत शिवसेनेचे हवेली विभागप्रमुख स्वप्नील कुंजीर पाटील यांनी व्यक्त केले.
सोमवारी (दि. 3 सप्टेंबर) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास थेऊर (ता. हवेली) येथील स्मशानभूमी जवळ मुळा-मुठा नदीच्या पाण्यात भगतसिंग वीरबहादूर भूल यांच्या कुटुंबातील तिघेजण वाहून गेले होते. या दुर्घटनेत भगतसिंग भूल यांची मुलगी भजन (वय 19), सून चंद्रकला (वय 23) आणि नात सोनिया (वय 4) हे तिघेही वाहून गेले होते. यावेळी हे सर्व जण स्मशानभूमी जवळील मुळा-मुठा नदीच्या पात्रात कपडे धुण्यासाठी गेले होते.
भगतसिंग भूल यांच्या कुटुंबाला थेऊर येथील चिंतामणी मंदिरात झालेल्या कार्यक्रमात स्वप्नील कुंजीर पाटील आणि नर्सरी व्यावसायिक रामदास कुंजीर पाटील तसेच चिंतामणी मंदिरातील देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी यांच्या वतीने आर्थिक मदत केली. यावेळी स्वप्नील कुंजीर पाटील बोलत होते. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त आनंद महाराज तांबे, गुरव संघटना अध्यक्ष संकेत आगलावे, आनंद काकडे, नुतन कुंजीर, राणी कुंजीर, देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी आणि भाविक उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)