अपंग शाळांना मिळणार संजीवनी

संग्रहित फोटो

121 शाळेच्या पदनिर्मितीस मान्यता : शिक्षण तज्ज्ञांकडून स्वागत

पुणे – राज्यातील शासनाच्या खासगी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या विनाअनुदानित तत्त्वावरील अपंगांच्या 121 शाळेच्या पदनिर्मितीस राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार या शाळेसाठी 2 हजार 464 नवीन पदे निर्माण करण्यास राज्य शासनाने मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अपंग शाळेला आता नवसंजीवनी येण्याची चिन्हे आहेत.
राज्यात अनुदानित व विनाअनुदानित तत्त्वावरील अपंगांच्या विशेष निवासी व अनिवासी 121 शाळा आहेत.

या शाळांना वेळोवेळी अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार या शाळांना वेतन, वेतनेत्तर अनुदान आणि शाळेतील विद्यार्थ्यांसाठी परिपोषण अनुदान देण्यात येते. या शाळांना अनुदान देण्याचा निर्णय 8 एप्रिल 2005 रोजी घेण्यात आला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या शाळांसाठी पदनिर्मिती करणे आवश्‍यक होते. त्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. त्यात शाळेतील सर्व पदांना मान्यता देण्यात आली आहे.

आकृतीबंधानुसार ही पदनिर्मितीस मान्यता मिळाली आहे. त्यामुळे पद भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अपंग शाळांसाठी अडीच हजार पदे भरण्यात येणार असल्याचे, अपंग शाळेला चांगले दिवस येण्याचे संकेत मिळत आहेत. या शाळेसाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, कार्यालयीन विभाग, वसतिगृह विभाग, कर्मशाळा विभागांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात पदनिर्मिती होत आहे ही बाब स्वागतार्ह म्हणावी लागले, असे शिक्षण तज्ज्ञांतून प्रतिक्रिया उमटत आहे.

केंद्र शासनाच्या अपंग व्यक्‍त हक्‍क अधिनियम, 2016 च्या तरतुदी विचारात घेऊन पुणे अपंग कल्याण आयुक्‍तांनी अपंग विद्यार्थ्यांना सर्वसाधारण विद्यार्थ्यांबरोबर शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कालबद्ध बृऱ्हत आराखडा तयार करावा. त्यानुसार अंमलबजावणीची कार्यवाही करावी, असेही शासनाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)